ऑनलाईन टीम / पुणे :
सत्तेत असल्यावर रस्त्याला, चौकाला आपली कुटुंबियांची किंवा मर्जीतल्या लोकांची नावे दिली जातात. परंतु भारतीय जनता पार्टीचा एक नियम आहे की, आपल्या पेक्षा समाजात खूप श्रेष्ठ लोक आहेत. लोक प्रतिनिधी झाल्यावर आपलेच नाव सर्वत्र घ्या, अशी परंपरा भारतीय जनता पाटीर्ची नाही. डी.एस. खटावकर यांचे नाव त्यांच्या कलेने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.त्यांच्या कलेला तोड नाही. त्यागी आणि समर्पित वृत्त्तीने या कलायोगीने आपली कला जोपासत कार्य केले. कलेसाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. तुळशीबागेत आलो आणि डी.एस. खटावकर यांची आठवण येत नाही, असे कधीही होत नाही. त्यांचा सन्मान करण्यासाठी हे अधिकृतपणे नाव दिले आहे, असे खासदार गिरीष बापट यांनी सांगितले.गणपती चौक ते तुळशीबाग गणपती मंदिर या रस्त्याचे कलामहर्षी कै.प्रा. डी. एस. खटावकर पथ असे नामकरण व फलकाचे अनावरण खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैलेश टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नाव समितीचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, अॅड. प्रताप परदेशी, बाळासाहेब दाभेकर, तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, नितीन पंडित उपस्थित होते. तसेच खटावकर कुटुंबीय उपस्थित होते.गिरीष बापट म्हणाले, तुळशीबाग हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण तर आहेच त्या सोबत सुरक्षित ठिकाण देखील आहे. एखाद्या कुटुंबाप्रमाणेच वातावरण तुळशीबागेत आहे. अशा वातावरणातील या रस्त्याला कलामहर्षी कै.प्रा. डी. एस. खटावकर पथ हे नाव देवून त्यांचा सन्मान केला आहे.