बेळगाव परिसरातील पहिल्याच महिला डॉक्टर ठरल्या
प्रतिनिधी / बेळगाव
विशेष मुलांमध्ये असणारे नेत्रदोष यावर उपचार करणाऱया पद्धतीवर बेळगावच्या डॉ. स्मिता प्रभू यांनी केएलईमधून पीएचडी संपादन केली आहे. या विषयावर पीएचडी मिळविणाऱया बेळगाव परिसरातील त्या पहिल्याच महिला डॉक्टर ठरल्या आहेत. विशेष मुलांमध्ये मज्जातंतू व डोळे यांच्यातील सहसंबंध योग्य प्रमाणात होत नसल्यामुळे उद्भवणाऱया रोगावर त्या उपचार करीत आहेत.
स्मिता या म्हैसूर येथून एमबीबीएस झाल्या आहेत. जे. एन. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.एस.ची पदवी मिळविली. यासोबत युरोप, रशिया येथील फेलोशिप देखील मिळविली आहे. विशेष मुलांमध्ये काहीतरी काम करण्याची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी याच विषयावर पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. केएलईचे डॉ. व्ही. डी. पाटील व डॉ. महेश कामटे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले आहे.
केएलईत विशेष मुलांसाठी स्वतंत्र विभाग
विशेष मुलांवर उपचार करण्यासाठी केएलईमध्ये स्वतंत्र विभाग उघडण्यात आला आहे. या विभागात डॉ. स्मिता कार्यरत आहेत. बाळ जन्माला आल्यानंतर त्यामध्ये दोष आढळल्यास त्यावेळीपासूनच त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात. योग्यवेळीच जर उपचार झाले तर त्यांच्यातील दोष कमी केले जाऊ शकतात. रुग्णांसोबतच त्यांच्या पालकांनाही या सर्वांविषयी माहिती द्यावे लागते, असे स्मिता यांनी सांगितले.
उपचार पद्धती ठरतेय यशस्वी
युकेमध्ये डॉ. जॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपचार पद्धती अवलंबली जाते. परंतु त्यासाठी लागणाऱया उपकरणांचा मोठा खर्च येतो. इतका खर्च भारतासारख्या देशामध्ये करणे शक्मय नसते. या ठिकाणी सर्वसामान्य रुग्ण येत असल्यामुळे भारतात उपलब्ध होईल अशा साहित्याच्या माध्यमातून त्यांना उपचार करावे लागतात. 5 ते 90 टक्के रुग्ण या उपचारपद्धतीमुळे बरे होऊ शकतात. फक्त योग्य वेळेत रुग्णांवर उपचार होणे गरजेचे असल्याची माहिती त्यांनी दिली.