बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय गुन्हे शाखा सँडलवुड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरु असून अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत विशेष न्यायालयासमोर सादर केले जाईल. या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे १८० दिवसांचा कालावधी आहे.
आतापर्यंत २० जणांविरूद्ध कॉटनपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत संजना गलराणी, रागिणी द्विवेदी, वीरेन खन्ना, सायमन, बेनाल्ड उडेना, राहुल आणि रविशंकर यांच्यासह आदित्य अल्वा, प्रशांत राजू, अभिस्वामी आणि मेसी यांच्यासह सुमारे सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी फरार झालेल्यांविरुद्ध लूकआउट नोटिसा बजावल्या असून त्यांना पकडण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याचे म्हंटले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त गौतम यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीसीबीने ४ सप्टेंबर रोजी कॉटनपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन महिन्यांहून अधिक काळ तपास सुरु आहे. तपास अधिकाऱ्यांनी तांत्रिक आणि मॅन्युअल पुरावे गोळा केले आहेत. ते प्रथम प्राथमिक आरोपपत्र सादर करतील आणि अतिरिक्त आरोपपत्र पुढे सादर करतील.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्ही आरोपी व्यक्तींचा ड्रग प्रकरणात असणारा सहभाग आणि त्यांच्या सहभागाबद्दल भूमिकेचा सविस्तर उल्लेख करणार असल्याचे म्हंटले आहे. अधिकाऱ्यांनी आंद्रेत रे आणि दिगंथ, फॅशन शो आयोजक रमेश डेंबला, पार्टी कार्यकर्ता कार्तिक राज, गुंड मुथप्पा राय यांचा मुलगा रिकी राय, निर्माता सौंदर्या जगदीश आणि इतर काही कलाकारांची चौकशी केली आहे. त्यांची सर्व विधाने आरोपपत्रात कोर्टासमोर सादर केली जातील, असे सांगितले आहे.