प्रतिनिधी /बेळगाव
आरटीओ कार्यालयासमोर स्मार्ट बसथांबा उभारण्यात आला. त्याकरिता गटारीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, बसथांब्याशेजारी ड्रेनेज चेंबरवरील झाकण पूर्णपणे खराब झाले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे. ते कोणत्याही क्षणी कोसळण्याचा धोका असून नागरिकांना धोकादायक बनले आहे. सदर झाकण बदलण्याची दक्षता महापालिका प्रशासन घेणार का, अशी विचारणा करण्यात येत आहे. या ठिकाणी आरटीओ चौक अरुंद असल्याने वाहनांची गर्दी होत असते. या परिसरात आरटीओ कार्यालयात ये-जा करणाऱया नागरिकांची गर्दी आणि वाहनांची गर्दी दररोज होत असल्याने हा चौक गजबजलेला असतो. त्यामुळे कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या ड्रेनेज चेंबरचा धोका अधिक आहे. सदर ठिकाणी बसथांबा असून रात्रीच्यावेळी या ठिकाणी ट्रव्हल्सच्या बसदेखील थांबतात. त्यामुळे बसमध्ये बसण्याची घाई नागरिकांना असते. रात्रीच्यावेळी सदर चेंबर लक्षात येत नसल्याने अपघात होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी डेनेज चेंबरवरील झाकण बदलण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.