ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीविषयी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक रोज नवनवे खुलासे करत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याच्या खबऱ्यामधील व्हॉट्सॲप चॅटींग मलिकांनी शेअर केले आहे. त्यामध्ये काशिफ खान याचा उल्लेख करण्यात आला आहे.
हे चॅट्स शेअर करताना मलिक म्हणतात, केपी गोसावी आणि खबऱ्यामधले हे चॅट्स आहेत. यामध्ये काशिफ खानचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. मग काशिफ खानची चौकशी का झाली नाही? काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे यांच्यात काय संबंध आहे? ही वानखेडेंची खासगी आर्मी आहे.
मलिकांनी यापूर्वी मी एक फोटो शेअर करत ‘दाढीवाला कोण आहे?’ हा दाढीवाला फॅशन टीव्हीचा इंडिया हेड काशिफ खान आहे. फॅशनच्या नावाखाली पोर्नोग्राफी, ड्रग्ज आणि सेक्स रॅकेटचा व्यवसाय करतो, असा आरोप केला होता.
मात्र, समीर वानखेडे यांनी त्या पार्टीत काशिफ खानवर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्याला क्रूझमधून जाऊ दिले. क्रूझवरील इतर लोकांचा शोध लागला नाही. मात्र, सुपरस्टारचा मुलगा सापडला. यावरुन हे स्पष्ट होते की, पार्टीतील लोकांना अडकविण्याचा प्लॅन आधिपासूनच ठरला होता.
दरम्यान, मी या प्रकरणासंदर्भात जी माहिती गोळा करत आहे, त्यासाठी कोणत्याही सरकारी संस्थेची मदत घेत नाही, असेही मलिक म्हणाले.