अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 28 जून 2021, सकाळी 11.20
● पॉझिटिव्हीटी दर 7.64 टक्क्यांवर ● रविवारी अहवालात 497 बाधित ● 6,505 जणांचे नमुने तपासले ● जिल्ह्यात 3,034 बेड रिक्त ● ऑक्सिजनसह 2,105 बेड रिक्त ● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 1,805 रुग्ण ● लॉकडाऊनमध्ये काही बदल नाही
सातारा / प्रतिनिधी :
शुक्रवारी आलेल्या अहवालात हजारांच्या संख्येने बाधित समोर आले तर शनिवारी रात्रीच्या अहवालात 977 जणांचा अहवाल बाधित आल्याने जिल्ह्यात पुन्हा चिंता वाढत असतानाच रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीचा आलेख खाली घसरला आहे. 497 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी दरही 7.64 टक्के एवढा राहिला असल्याने सोमवारी थोडा दिलासा लाभला आहे. दरम्यान जिल्ह्यात 3,034 बेड रिक्त असून यामध्ये 2,105 ऑक्सिजन बेड रिक्त आहेत.
पॉझिटिव्हिटी दर 7.64
रविवारी रात्री आलेल्या अहवालानुसार 6505 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत यामध्ये 497 जणांचा अहवाल बाधित आला त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.64 एवढा दिलासादायक राहिला आहे. यामध्ये 4,198 जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आलेले असून त्यामध्ये 271 बाधित आलेले आहेत तर 2,307 जणांची rt-pcr टेस्ट आल्यानंतर 226 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे.
लॉकडाऊनमध्ये बदल नाही
गतवेळच्या आकड्यांनुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह इतर दुकानांना जी वेळ देण्यात आलेली आहे, त्यात अद्याप काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र तरीही व्यापारी वर्गांमध्ये बदल केल्याबाबतचे मेसेज फिरत असल्याने याबाबत अद्याप दुकानदारांच्या मनात गोंधळ आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप नवीन आदेश पारित झालेला नाही.
रविवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने 10,51,467, एकूण बाधित 1,91,435, एकूण कोरोनामुक्त 1,77,946, मृत्यू 4,336, उपचारार्थ रुग्ण 10,187
रविवारी जिल्ह्यात बाधित 977, मुक्त 241, बळी 15