ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यावर केजरीवाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, या नव्या निर्णयानुसार, दिल्लीतील बाजारपेठा सोमवारपासून पूर्णवेळा सुरू राहणार आहेत.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेत मागील काही दिवसांपासून दिल्लीतील बाजार रात्री 8 वाजेपर्यंतच खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. आता राजधानी दिल्लीत कोरोना रूग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट होताना दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सर्व बाजार पहिल्याप्रमाणे पूर्ण वेळासाठी सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- दिवसभरात दिल्लीत कोरोनाचे 19 नवे रूग्ण
मागील 24 तासात दिल्लीत केवळ 19 नवे रुग्ण आढळून आले. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही आहे. तर कालच्या दिवशी 48 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून शनिवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 37 हजार 293 वर पोहोचली आहे. त्यातील 14 7लाख 11 हजार 784 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.3 टक्के इतका आहे. तर आतापर्यंत 25,079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.