ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मागील पाच दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. रविवारी 46 हजार 951 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 212 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 16 लाख 46 हजार 081 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 967 एवढी आहे.
रविवारी 21,180 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 51 हजार 468 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 3 लाख 34 हजार 646 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 4 कोटी 50 लाख 65 हजार 998 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 23 कोटी 44 लाख 45 हजार 774 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 8 लाख 80 हजार 655 कोरोना चाचण्या रविवारी (दि.21) करण्यात आल्या.