वार्ताहर /धामणे
धामणे येथे सोमवार दि. 21 रोजी तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती विविध संघटना आणि नागरिकांच्यावतीने हभप बसय्या स्वामी मास्तमर्डी यांच्या सानिध्यात पार पडली.
सकाळी 7 वाजता कलमेश्वर मंदिरशेजारील शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालून पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी मूर्ती प्रति÷ानच्यावतीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, ग्रा. पं. माजी सदस्य विजय बाळेकुंद्री, आनंद जायाण्णाचे आणि शिवप्रति÷ान धामणे विभागप्रमुख महेश पाटील यांनी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीला मालार्पण केले.
छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या वडूबुद्रुक (महाराष्ट्र) येथील समाधीचे दर्शन घेऊन आलेले धामणे विभागातील 40 धारकऱयांचे 6 वाजता वडूबुद्रुकहून येथे आगमन झाले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर शिवमय झाला
होता.
छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचे विचार आणि त्यांचा इतिहास आचरणात आणून युवकांनी समाजात कार्य करणे गरजेचे असल्याचे बंडू केरवाडकर यांनी सांगितले. यावेळी हभप बसय्या स्वामी मास्तमर्डी व महेश पाटील यांनीही विचार व्यक्त केले.
याप्रसंगी बाळू जायाण्णाचे, विनोद अकणोजी, बाळू केरवाडकर, शिवाजी पाटील, प्रकाश रेमाण्णाचे, गावडू पाटील, किशोर बेळगावकर, प्रशांत बाळेकुंद्री, कुमाण्णा कोमाण्णाचे, शिवप्रति÷ानचे धारकरी, छत्रपती शिवाजी मूर्ती प्रति÷ानचे सदस्य व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
राजहंसगड येथे
धामणेः राजहंसगडमध्ये तिथीनुसार छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणामंत्राने झाली. त्यानंतर नवदीप युवक मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लोखंडे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले तर चव्हाण यांनी श्रीफळ वाढविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी नानाजी लोखंडे, शुभम मावळ, नागराज नावगेकर, विशाल नावगेकर, मारुती लोखंडे, सूरज थोरवत, कृष्णा जाधव, महांतेश कुंडेकर, हरिष नलावडे आदी शिवप्रेमी व गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.