ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 26 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धाची धग अधिक तीव्र झाली असून, रशियाकडून युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही या युद्धाचे शिकार बनत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिण भागातील खेरसन शहरात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर बेछूट गोळीबार केला आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे.
दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच “दक्षिणेकडील मॉस्को शहरावर कब्जा करण्याच्या विरोधात खेरसन येथील लोक निदर्शने करत होती. त्यावेळी रशियन सैनिकांनी खेरसनमधील या आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला”, असा दावाही कुलेबा यांनी केला आहे.