बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य उच्च शिक्षण परिषद (केएसएचईसी) च्या नेतृत्वाखालील एक विशेष टास्क फोर्स २० ऑगस्ट रोजी राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) च्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल सादर करणार आहे.
उपमुख्यमंत्री अश्वनाथनारायण यांनी गुरुवारी एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी एनईपीचा स्वीकार करून एक ठराव मंजूर करण्यात आला. टास्क फोर्स १६ ऑगस्टला कृती आराखडा तयार करेल आणि २० ऑगस्ट रोजी सविस्तर अहवाल सादर करेल, असे अश्वनाथनारायण यांनी सांगितले.