वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज सोधीने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत आगळा विक्रम नोंदविला. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सुपर स्मॅश टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात नॉर्दन ब्ा्रsव्ह संघाकडून खेळताना सोधीने आपल्या चार षटकांत पाच धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेण्याचा विक्रम नोंदविला. नॉर्दन ब्रेव्हने या सामन्यात ऑकलंड एसीस संघाचा सहा गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात नॉर्दन ब्रेव्ह संघातर्फे अनुराग वर्माने 14 धावांत 3 तर वॉकरने 10 धावांत 3 गडी बाद केले. ऑकलंड एसीसचा डाव 17.2 षटकांत 92 धावांत आटोपला. त्यानंतर नॉर्दन ब्रेव्हने 15.1 षटकांत 4 बाद 93 धावा जमवित हा सामना जिंकला. या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सोधीने किफायत गोलंदाजीचा विक्रम नोंदविला. महिलांच्या विभागात इडेन स्पार्कने 5 धावांत 1 गडी मिळविण्याचा विक्रम केला आहे.