ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. रुग्ण संख्या वाढत वाढत एक लाखाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 1,100 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 12 हजार 460 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,12,460 रुग्णांपैकी 92 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 359 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 16,824 रुग्णांवर उपचार सुरू
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 18 लाख 10 हजार 086 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 16 हजार 824 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 396 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 65 जण व्हेंटिलेटरवर आहेत.