ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 549 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 29 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 59 हजार 099 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 651 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत एकूण 1,59,099 रुग्णांपैकी 1 लाख 46 हजार 777 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 036 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 34 लाख 68 हजार 629 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 286 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 133 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 14 जण व्हेंटिलेटरवर आहेत.