ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या सरकारी टीव्ही चॅनेलने त्यांची लोकसंख्या दाखवताना पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे दाखवले. त्यानंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली असून, पंतप्रधान इम्रान खान यांना सोशल मीडियावर सर्व स्तरातून ट्रोल केले जात आहे.
पिटीव्ही हे पाकिस्तानचे सरकारी न्यूज चॅनेल आहे. या चॅनलने कोरोना विषाणूसाठी बनविलेल्या वेबसाइटच्या माध्यमातून पीओकेचा एक नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशात पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग भारताचा दाखवण्यात आला आहे, त्याचा भारत आधीच दावा करत आला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांनी तात्काळ या मुद्यावर इम्रान खान यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
या वृत्तावर पिटीव्हीने निवेदन दिले आहे की, मानवी चुकांमुळे पाकिस्तानचा नकाशा चुकीचा दाखविण्यात आला. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.