वार्ताहर/केळघर
पुनवडी ( ता. जावली ) येथील कोरोना बाधितांच्या संख्या दररोज वाढत असून ही साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर परिश्रम घेत आहे . तर काल रात्री उशिरा आलेल्या अहवालात 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून येथील एकूण बाधितांची संख्या 113 झाली आहे .
पुनवडी गावची मूळ लोकसंख्या 591 असून यामध्ये 138 मुंबईकर संख्या अशी एकूण 729 लोकसंख्येपैकी आतापर्यंत 379 जणांचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत . तर आज पुनवडी येथे 101 तर भणंग येथे 148 जणांचे स्वॅब घेण्यासाठी आरोग्य विभागाने मोठी यत्रंणा उभी केली . यामध्ये वैद्यकिय अधिकारी , कर्मचारी यांच्यासह 102 व 108 या वाहनांसह एस टी बसची वाहतुकीसाठी मदत घ्यावी लागली . अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . भगवान मोहिते यांनी दिली .
जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ . साधना कंवारे , आरोग्य सहाय्यक सतीश मेढेकर , विशाल रेळेकर , आरोग्य सेवक मोहन शिंदे , अरविंद सोमवंशी , आरोग्य सेविका अस्मा शेख , तलाठी संदीप ढाकणे , ग्रामसेवक यादव यांच्यासह आशा वर्कर , अगंणवाडी सेविका , आरोग्य विभाग , महसूल विभाग , पंचायत समिती ,परिसरातील कर्मचारी संयुक्तपणे विविध उपाययोजना करत दररोज घरोघरी फिरून माहिती घेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परिश्रम घेत आहेत . तर केळघरचे सरपंच रविंद्र सल्लक , व्यवसायिक संतोष कासुर्डे , प्रमोद शिर्के यांनी पीपीई किट घालून पुनवडी येथील बाधित घरात सोडियम हायप्रो ऑक्साईड या जंतू नाशकाची फवारणी करत सामाजिक बांधिलकी जोपासली . त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून या गावातील नागरिकाना मदतीबरोबरच दिलासा देण्यासाठी सामाजिक घटकांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे . तर आज सकाळी संबधित नागरिकांना आणण्यासाठी दोन एस टी बस पुनवडी येथे गेल्या होत्या . त्या त्यांना घेऊन केळघर येथे आल्यावर संबधित चालकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून देण्यात आलेली पीपीई किट घेऊन तशीच शेजारी ठेवून देत गाडी भणंगला नाही . हा निष्काळजीपणा त्यांच्या जीवावर बेतू शकतो . अशी चर्चा पाहणाया नागरिकांनी व्यक्त केली .