राजपथावर भारताच्या सामर्थ्य, संस्कृतीचे दर्शन : डीआरडीओच्या उपग्रहविरोधी प्रणालीचे सादरीकरण, ब्राझीलच्या अध्यक्षांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन रविवारी नवी दिल्ली येथे दिमाखात साजरा करण्यात आला. राजपथावर पार पडलेल्या संचलनात भारताच्या सैन्य सामर्थ्याची प्रचिती झाली आहे. तसेच विविध राज्यांच्या चित्ररथांमधून सांस्कृतिक वारसा दर्शविण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोहळय़ाचे प्रमुख अतिथी ब्राझीलचे अध्यक्ष जायर मेरियस बोल्सोनोरो यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटनजीकच्या अमर जवान ज्योती ऐवजी राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या ठिकाणी जात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. संचलनात वायुदलाच्या चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तसेच वायुदलात लवकरच सामील होणाऱया राफेल विमानाची प्रतिकृती सादर करण्यात आली. कॅप्टन तान्या शेरगिलच्या रुपात स्त्राrशक्तीचे दर्शनही घडले आहे. आयटीबीपीच्या तुकडीने राजपथावर दमदार संचलन केले. कॅप्टन दिपांशू शेरॉन यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाच्या ताफ्याने राजपथावर दमदार संचलन केले.