प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरातील प्रसिध्द ’धनकेशर’ फर्मचे मालक व प्रतिथयश मसाला व ड्रायप्रूटचे व्यापारी रविंद्रकुमार धन्यकुमार दोशी (खटावकर) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 63 होते. त्यांच्या अचानक निधनाने सातारा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच व्यापारी वर्गाला मोठा धक्का बसला.
रविंद्रकुमार दोशी यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित मुली, जावई, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रविंद्रकुमार दोशी यांनी मसाल्याच्या व्यापारात प्रगती होती. धनकेशर नावानेच ते प्रसिध्द होते. बोलका स्वभाव, दुसऱयांच्या मदतीला धावून जाण्यांची त्यांची वृत्ती होती. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने जैन धर्मातील तीर्थस्थळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. धार्मिक कार्याला त्यांनी सढळ हाताने नेहमीच मदत केली.
साताऱयात सदाशिव पेठेतील सम्राट चौकातील त्यांचे धनकेशर ही फर्म प्रसिध्द होती. असंख्य ग्राहकांशी वर्षानुवर्षाचे अतूट नाते जपत त्यांनी सातारकरांशी ऋणानुबंध जपले होते. ग्राहकांबरोबरच व्यापारीवर्गात देखील ते सर्वांना प्रिय होते. त्यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला.