प्रतिनिधी / महाबळेश्वर
प्रवेशकर व प्रदुषण कराचा ठेका रद्द् करण्यात यावा व या करांची वसुली पालिकेने स्वतः करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचेकडे निवेदना व्दारे केली या वेळी नगरसेवक कुमार शिंदे हे देखिल उपस्थित होते
महाराष्ट्चे लाडके थंड हवेचे ठिकाण म्हणुन ओळख आलेल्या महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी दरवर्षी साधारण आठरा ते वीस लाख पर्यटक येतात पर्यटकां कडुन महाबळेश्वर पालिका हा प्रवेशकर व वाहनांचा प्रदुषणकर वसुल करीत असते अलिकडे ही वसुली खाजगी ठेकेदाराकडुन केली जाते कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मार्च महीन्यात देशात लॉकडाउन लागु झाला तेव्हा पासुन हा टोल नाका बंद आहे आता देशात टप्प्या टप्प्याने अन्लॉक जाहीर होत असुन सर्व शहर आता पुर्वपदावर येत आहे बोटक्लब पाठोपाठ शहरातील सर्व पॉइंZट पर्यटकां साठी खुले होणार आहे हे पॉईंट खुले झाल्या नंतर पालिकेच्या वतीने पर्यटका कडुन कर वसुली सुरू करण्यात येणार आहे आता ही वसुली खाजगी ठेकेदारां कडुन केली जाणार की पालिका स्वतः करणार या बाबत संभ्रमाचे वातावरण आहे अशातच शिवसेनेने आज कर वसुली पालिकेने सुरू करावी व खाजगी ठेका रद्द् करावा अशी मागणसी केल्याने पालिके समोर पेच निर्माण झाला आहे
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेच्या पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची भेट घेवुन त्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गुजर युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे , माजी शहर प्रमुख सुनिल साळुंखे , अर्बन बॅकेचे माजी अध्यक्ष मनोज ताथवडेकर , संघटक प्रविण कदम , प्रविण शिंदे ,शंकर ढेबे , गोपाळ लालबेग , उस्मान खारखंडे , संदीप मोरे , चंद्रकांत पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे बरोबर बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंभारदरे यांनी टोल बाबत आपली भुमिका स्पष्ट केली टोल वसुलीचा खाजगी ठेकेदारास दिलेला ठेका रद्द् करण्यात यावा याचे कारण खाजगी ठेकेदार हा सर्व नियम धाब्यावर बसवुन वसुली करीत असतो नाक्यावरील कर्मचारी पर्यटकां बरोबर सौजन्याने वागत नाही उर्मट भाषा वापरून दमबाजी करतात त्यांचेकडे ओळखपत्र ही नसते तर कर्मचारी गणवेश ही घालत नाहीत या पेक्षा अधिक भयंकर म्हणजे ते पालिकेने ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने टोल वसुल करीत असतात महाबळेश्वरचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने पांचगणीचाही ठेका घेतला त्या मुळे तो पांचगणी येथील दांडेघर टोल नाक्यावर महाबळेश्वरचा टोलही पांचगणी येथे जबरदस्तीने वसुल करीत असतो अशा प्रकारे नियम धुडकावुन वसुली करणारा ठेका रद्द् करण्यात यावा या पुढे ही वसुली पालिकेने आपल्या कर्मचारी यांचे मार्फत करावी या साठी स्थानिक बेरोजगार युवकांना काम करण्याची संधी दयावी त्या मुळे शहरातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल व स्थानिक भुमिपुत्रांना रोजगार मिळेल अशा मागण्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केल्या
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या वेळी नगराध्यक्षांचे निवेदन नगरसेवक कुमार शिंदे यांनी स्विकारले शिष्ट मंडळाशी बोलताना कुमार शिंदे यांनी शिवसेनेच्या मागणीचा पालिका जरूर विचार करेल असे आश्वासन दिले .