वार्ताहर / कागवाड:
धार्मिक पुण्याईच्या कार्यात दान देण्यासाठी कसलीही परिस्थिती आड येत नाही. माणसाच्या मनाची उदार श्रीमंती ही दात्तृत्वाला प्रवृत्त करते, याची प्रचिती येत्या 13 ते 18 एप्रिल 2020 दरम्यान कागवाड येथील मूलनायक श्री 108 भगवान आदिनाथ तिर्थंकर नूतन मानस्थंभ चतुर्मूख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर या महोत्सवास निधी संकलन करण्यासाठी विविध सवालाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात संजय गुंडू फिरगण्णवर दाम्पत्याने 5 लाख 5 हजार 555 रुपयांचा सवाल धरल्याने त्यांचे जैन समाजात कौतुक होत आहे.
आचार्यश्री 108 वात्सल्यरत्न शांतमूर्ती सन्मतीसागर महाराजांचे परमशिष्य श्री 108 आचार्य चंद्रप्रभू महाराजांच्या सानिध्यात येथील जैन मंदिर विविध सवालांचा कार्यक्रम संपन्न झाला. या सवालात त्यांनी उपरोक्त विक्रमी रुपयांचा सवाल धरुन सौ. व श्री. संजय फिरगण्णवर हे यजमान पदाचा मानकरी ठरले.