राज्यव्यापी बंदमुळे प्रवाश्या अभावी मध्यवर्ती बसस्थानकामध्ये शुकशुकाट दिसत होता.
प्रतिनिधी/कोल्हापूर
सोमवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे राज्यातील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती. याचा परिणाम राज्य परिवहन महामंडळाच्या बसवाहतूकीवरही झाला आहे. प्रवाशी नसल्याने, एसटी व रिक्षा सेवाही बंद होती. यामुळे कोल्हापूर आगाराचे उत्पन्नही घटले आहे.
सोमवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे एसटी सेवेवरही परिणाम झाला आहे. कोरानामध्ये शिथिलता आल्याने, बंद असलेली देऊळे उघडण्यात आली आहेत. तसेच एसटी सेवा सुरळीत झाल्याने, एसटीसाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. पण सोमवारी झालेल्या राज्यव्यापी बंदमुळे कोल्हापूर आगारातील एसटी सेवेवर परिणाम झाला आहे.
बंदच्या परिस्थितीची माहीती घेऊनच त्या-त्या आगारातून एसटी सोडण्यात येत होत्या. तसे पत्रही पोलिसखात्यांनाही देण्यात आले होते. महामार्गही बंद ठेवल्याने एसटी सेवा थंडावली होती. यामुळे कोल्हापूर आगारामध्ये शुकशुकाट दिसत होता. एसटीच्या किती फेऱया बंद होत्Îा व किती उत्पन्न घटले याची माहीती घेण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.
रिक्षा स्टॉपही सुनेसुने
रिक्षा संघटनांनी राज्यव्यापी बंदला पाठींबा दिला होता. या बंदमुळे शहरातील रिक्षा व्यवसाय बंद होता. ऐरवी शहरातील बसस्टॉपवर रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसत असे. पण बंदमुळे रिक्षा स्टॉपही सुनेसुने दिसत होते.