नवी दिल्ली
रंग उत्पादक कंपनी बर्जर पेंटस् ने आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले असून येत्या 3 वर्षात 10 हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.
पुढील 3 वर्षानंतर कंपनी 100 व्या वर्षात पदार्पण करणार असून आर्थिक वर्ष 2021 अखेर कंपनीची उलाढाल 6 हजार 800 कोटी रुपयांवर राहिली आहे. बर्जर पेंटस् देशासह विदेशातही आपल्या व्यवसायाला अधिक गती देत आहे. सजावटीसह संरक्षणयुक्त व बांधकाम रसायनांच्याबाबतीत कंपनी भारतीय बाजारात आपला विस्तार जोमाने करणार आहे.