प्रतिनिधी/ म्हसवड
गेल्या आठ दिवसांपूर्वी सातारा सोलापूर जिह्यच्या हद्दीवर असलेल्या पिलीव घाटात चोरीच्या उद्देशाने एस. टी. बसवर दगडफेक करून दरोडा टाकण्याच्या प्रयत्न करुन पळुन गेलेल्या दरोडेखोराच्या टोळीला अटक करण्यात माळशिरस पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या पाच जणांपैकी दोघे अल्पवयीन आहेत. तर अद्याप तिघे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात माण तालुक्यातील देवापुर येथील तिघांचा समावेश आहे. या दरोडय़ाचा मुख्य सुत्रधार आटपाडी (ता. सांगली) येथील आहे. या दरोडय़ाचा तपास सोलापूर, सांगली व सातारा पोलीस करत आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला.
मंगळवार 19 रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान पिलीव घाटात दबा धरुन बसलेल्या आठ दरोडेखोरांच्या टोळीने एस. टी. बसवर दगडफेक करून बसचा चालक व बसच्या मागुन येणाऱया मोटारसायकल स्वारास जखमी केले होते. या घटनेने सातारा, सोलापूर, सांगली हे तिन जिल्हे या दरोडय़ाच्या हल्ल्याने हादरुन गेले होते. या दरोडय़ाचा तपास करण्यासाठी सातारा, सोलापूर जिह्यातील पोलीस कामाला लागले होते. आठच दिवसात माळशिरस पोलिसांनी म्हसवड, दहिवडी, नातेपुते, अकलुज, वेळापुर, आटपाडी आधी ठिकाणी या दरोडय़ाची माहिती घेऊन सांगली जिह्यातील राजेवाडी (तलाव) बंधाऱयातील मासे खरेदी करण्यास व्यापारी म्हणुन आलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी राजेवाडी तलावाजवळ सापळा रचुन बस दगडफेक दरोडय़ातील पाच जणांना अटक केली. यातील दोन मुले हि अल्पवयीन असून या दरोडय़ातील आणखी तिघे फरारी असुन त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत.
या तपासासाठी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव घाटात महाराष्ट्र राज्य मार्ग विभागाच्या एस टी बस वर दरोडय़ाचा प्रयत्न केल्या प्रकरणी कारवाई सुरू आहे. याकामी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अकलुज पोलीस ठाण्याचे निरज राजगुरु, माळशिरस पोलीस ठाण्याचे शशिकांत शेळके, पोलीस हवालदार पंडित पिसाळ, दत्ता खरात, समाधान शेंडगे, सोमनाथ माने, सतीश धुमाळ व अन्वर आतार यांनी या पाच आरोपींना पकडण्यात यश आले असले तरी या दरोडय़ातील अजुन तिन आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.