बेळगाव : बसवाण गल्ली येथील श्री बसवाण्णा मंदिरात रविवारी सकाळी यात्रोत्सवानिमित्त सामूहिक गुग्गुळाचा कार्यक्रम झाला. महाप्रसादाने यात्रेची सांगता झाली.
रविवारी सकाळी बसवाण्णा मंदिरापासून गुग्गुळाला सुरुवात झाली. महालक्ष्मी मंदिर, कारंजीमठ, कलमठ, मारुती मंदिराला जाऊन बसवाण्णा मंदिर परिसरात गुग्गुळ काढण्यात आले. उळ्ळागड्डी खानापूर येथील निंगाप्पा कुंभार यांनी पुरवंताचे काम पाहिले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. सुरेश कलमनी, रत्नाकर कलमनी, अमित शेरी, स्वप्निल मोरे, प्रतीक मोरे, मंदिराच्या पुजारी माधवी पुजारी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.