रंगांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्याने वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
होळी आणि रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत रंगपंचमीचे साहित्य दाखल झाले आहे. बाजारपेठेमध्ये विविध पिचकाऱयांनी दुकाने सजली आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामधून गेली दोन वर्षे रंगपंचमी साजरी करता आली नव्हती. यंदा मात्र होळी आणि रंगपंचमी उत्साहात साजरी होणार अशी सुचिन्हे दिसत आहेत.
मात्र यंदा पेट्रोल, कच्चा माल, वाहतूक आणि मजुरी वाढल्याने रंगांच्या किमतीत 15 ते 20 टक्क्मयाने वाढ झाली आहे. पूर्वीच्या काळी रंग आणि पिचकारी एवढय़ावर रंगोत्सव साजरा होत असे. आज मात्र रंगोत्सवाची एक नवीन बाजारपेठच उदयाला आली आहे. मास्क, विविध रंगांच्या टोप्या, शिवाय रंगीबेरंगी केसांचे विग बाजारात आले आहेत.
येथील विपेत्यांशी चर्चा करता त्यांनी बेळगावमध्ये हर्बल रंग हुबळी व मुंबईवरून येतात तर इतर रंग बेंगळूर, सोलापूर, कोल्हापूरवरून येतात. बाजारपेठेत पावडर रंग 42 रुपये किलोपासून 80 रुपये किलोपर्यंत असून त्यामध्ये 20 नमुने उपलब्ध आहेत. बाजारपेठेत मेटॅलिक रंग 20 रुपयांना 100 ग्रॅम, हर्बल रंग 30 रुपयांना 100 ग्रॅम, साडी रंग 10 रुपयांना 20 ग्रॅम या दराने उपलब्ध आहेत. पिचकारी सहा रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत, टिमकी व ड्रम 40 ते 250 रुपयांपर्यंत, विग 65 पासून 300 रुपयांपर्यंत, कॅप 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत, मास्क 600 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. काही मास्क श्रीलंकेहून आयात केले जातात. स्मोक स्टीक 40 रुपयांना आहे.
मास्कला भरपूर मागणी असून अंदाज न आल्याने उत्पादन मात्र कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे मास्कचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नाही. रंगोत्सवासाठी बाजारपेठ सज्ज असली तरी याच दरम्यान परीक्षा असल्याने त्याचा फटका विक्रीला बसू शकतो, अशी शक्मयता प्रसाद या विपेत्याने व्यक्त केली. गुरुवारी रात्री होलिका दहन तर 18 रोजी रात्री रंगपंचमी साजरी होईल. शहापूर भागात पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी होईल.