बेंगळूर : बेकायदेशीरणे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱया 8 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. बेंगळूरच्या सिटी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपींकडून 13 पिस्तूल आणि 52 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हेगडेनगर येथील फयाजउल्ला खान (वय 31), विनय (वय 29), उत्तर प्रदेशमधील फराक कुमार (वय 39), गुजरातमधील शहनवाज अन्सारी (वय 29), मध्यप्रदेशमधील नासीर शेख, सलमान खान (वय 29), फप्रुद्दीन (वय 37) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या टोळीकडून कोणीकोणी पिस्तूल खरेदी केली, याविषयी अद्याप स्पष्टपणे माहिती पोलिसांना मिळालेली नाही. 29 जानेवारी रोजी बेंगळूरच्या जी. पी. स्ट्रीट येथील कोणार्क रेसिडेन्सी लॉजमध्ये बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि काडतुसांची बेकायदेशीरपणे विक्री करण्यात येत असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी लॉजवर छापा टाकून कादीर खान (वय 32) याला अटक केली. त्याच्याजळून दोन पिस्तूल व 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्याची चौकशी केली असता राजस्थान व मुजफ्फरनगर येथून शस्त्रास्त्रs मागवून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी या प्रकरणातील उर्वरित सात जणांच्या मुसक्या आवळल्या.
Trending
- राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय भोसले मैदानात !
- वेंगुर्ल्यातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
- नारायण राणे अडीच लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार – विशाल परब
- द्वेषपूर्ण भाषणे करण्याऐवजी सरकारच्या कामगिरीवर मते मागा : काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे
- “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
- प्रतापसिंह राणे आताही भाजपबरोबरच!
- अमित शहा यांची उद्या म्हापशात जाहीर सभा
- दाबोळीबाबत विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका