बेळगाव / प्रतिनिधी
बेकिनकेरे ग्राम पंचायतीवर नुकताच निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांना सदस्यपदाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. शुक्रवारी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी शंकर कांबळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रमाणपत्रांचे वितरण करून सदस्यांना गौरविण्यात आले.
वॉर्ड क्रमांक 1 मधून भावकू सावंत, जोतिबा धायगोंडे, लक्ष्मी गावडू गावडे, तर वॉर्ड क्रमांक 2 मधून लक्ष्मी (गंगुबाई) गावडे, बळवंत भोगण तर वॉर्ड क्रमांक 3 मधून राजू सावंत चुरशीच्या लढतीत विजयी झाले. वॉर्ड क्रमांक 1 मधून छबुताई शंकर कांबळे, वॉर्ड क्रमांक 2 मधून कल्पना कृष्णा कांबळे तर वॉर्ड क्र. 3 मधून लक्ष्मी सोमनाथ सावंत यांची बिनविरोध निवड झाली. बेकिनकेरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या अतिवाड येथील वॉर्ड क्रमांक 4 मधून मल्लाप्पा गुंडू पाटील, भरमा सातेरी व्हरकेरी, शांता जाणबा मण्णूरकर, विद्या विजय पाटील विजयी झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अधिकृत ग्रा. पं. सदस्यपदाचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. गावातील रखडलेली विकासकामे पूर्णत्वास नेण्याबरोबर गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहून गावचा विकास करू, अशा प्रतिक्रिया नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केल्या.
यंदा मतदारांनी नव्या चेहऱयांना संधी दिली असून या नव्या चेहऱयांकडून ग्रामस्थांतून गावच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त होत आहे. गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला असला तरी गावात पाणी समस्या कायमस्वरुपी आहे. त्यामुळे प्रथमत: गावातील पाणी समस्या दूर करावी, अशा भावना ग्रामस्थांतून क्यक्त होत आहेत.
याप्रसंगी निवडणूक अधिकारी शंकर कांबळे, ता. पं. माजी उपाध्यक्ष यल्लाप्पा मल्लू गावडे, ग्रा. पं. माजी अध्यक्ष अर्जुन भावकू डोंबले, सुरेश सावंत, ग्रा. पं. माजी सदस्य पुंडलिक सावंत, परशराम भातकांडे, नागनाथ सोसायटीचे व्हा. चेअरमन सोमनाथ सावंत, माजी चेअरमन चंद्रकांत भोगण, अश्विनी गावडे यासह ग्रा. पं. क्लार्क नागेश नंदगडे, सोमनाथ सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.