बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाच्या शिक्षणाधिकारीपदी बसवराज नलतवाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. बसवराज नलतवाड यांनी यापूर्वी बेळगाव शहराचे गटशिक्षणाधिकारी म्हणून दोन वेळा सेवा बजावली आहे. त्यामुळे बेळगाव परिसराचा त्यांना चांगला अनुभव आहे. बुधवारी ते जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील, असा अंदाज आहे. राज्यातील 22 शिक्षणाधिकाऱयांना जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून बढती देण्यात आली. तर 8 शिक्षणाधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाच्या शिक्षणाधिकारीपदी मोहन हल्ल्याटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. बेळगाव येथील सरकारी बीएड् महाविद्यालयात कार्यरत असलेल्या नलतवाड यांची बदली जिल्हा शिक्षणाधिकारीपदी झाली आहे. यामुळे घसरलेला बेळगाव जिल्हय़ाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यास नवे जिल्हा शिक्षणाधिकारी प्रयत्न करतील काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Previous Articleशहरातील सर्व्हिस रस्त्यांच्या स्वच्छतेकडे मनपाची पाठ
Next Article दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे सामुदायिक मौजीबंधन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.