प्रतिनिधी /बेळगाव
दैवज्ञ ब्राह्मण संघातर्फे जयवंती मंगल कार्यालय येथे सामुदायिक मौजीबंधन समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे समर्थ कारेकर, अध्यक्ष राजू बेकवाडकर, दैवज्ञ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नितीन कलघटकर यांच्या हस्ते गणेश पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी 21 बटुंवर उपनयन संस्कार प्रसिद्ध गुरुजी चिंतामण मुंडले, भटजी गजानन सोमन यांच्या सहकाऱयांनी केले. प्रियंका समर्थ कारेकर यांच्या हस्ते बटुंना ताम्हण, पळी, पंचपात्र देण्यात आले. त्यानंतर अतुल पारिश्वाडकर, नितीन कलघटकर, विवेक चिंचणेकर, मंजू मोदगेकर, राघवेंद्र काकतीकर यांच्या हस्ते बटुंना सोवळे उपरणे देण्यात आली.
होम झाल्यानंतर भिक्षांदेही काशीयात्रा वरात काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हेमंत मुतकेकर, दीपक अडकुरकर, देवीदास काकतीकर, विशाल शिरोडकर, मोहन कलघटकर, नितीन नंद्याळकर, प्रमोद पेडणेकर, मानतेश कलघटकर, राजू कित्तुरकर, संजय बांदिवडेकर, प्रमोद कोलवेकर, राजेश कारेकर, दयानंद कारेकर, दीपक कलघटगी, रवी कलघटगी, उमेश बांदिवडेकर, प्रसाद काकतीकर, शुभम कारेकर, पारितोष पोदार, सुरज कारेकर व इतर पदाधिकाऱयांनी परिश्रम घेतले. यावेळी देणगीदार व समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.