ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे स्थगित करण्यात आलेली भारत-ब्रिटन विमानसेवा 6 जानेवारीपासून पूर्ववत होत आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोनाचा नवा प्रकार लक्षात घेऊन ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा 23 ते 31 डिसेंबर दरम्यान स्थगित केली होती. मात्र, भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्याने विमानांवरील ही बंदी 5 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. 6 जानेवारीपासून भारत-ब्रिटन विमानसेवेचा पुनश्च हरि ओम होत आहे.
दरम्यान, 8 ते 30 जानेवारीपर्यंत ब्रिटनहून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याची घोषणा आरोग्य मंत्रालयाने केली आहे.