- मागील 24 तासात 50,209 नवे रुग्ण; 704 मृत्यू
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 50 हजार 209 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 83 लाख 64 हजार 086 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 24 हजार 315 एवढी आहे.
बुधवारी दिवसभरात 55,331 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 05 लाख 27 हजार 962 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 77 लाख 11 हजार 809 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 11 कोटी 42 लाख 08 हजार 384 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 लाख 09 हजार 425 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.04) एका दिवसात करण्यात आल्या.