वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओमान आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याविरूद्ध होणाऱया आगामी आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यांसाठी सराव शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबीर दुबईत घेतले जाणार असून सुनील छेत्रीशिवाय 27 जणांचा भारतीय फुटबॉल संघ दुबईला रवाना झाला.
भारत आणि ओमान यांच्यातील मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना 25 मार्चला होणार आहे तसेच भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील सामना 29 मार्चला होणार आहे. हे दोन्ही सामने दुबईमध्ये खेळविले जाणार आहेत. गेल्या आठवडय़ात सुनील छेत्री कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. या दोन्ही सामन्यापूर्वी भारतीय फुटबॉल संघासाठी सराव शिबीर आयोजित केले आहे. कोरोना संदर्भातील नियमावलींचे पालन या शिबिरात केले जाणार आहे.