ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा छोटा भाऊ असीम बॅनर्जी यांचे आज सकाळी कोरोनाने निधन झाले.
असीम यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोलकात्यातील मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे मागील महिनाभरापासून ते उपचार घेत होते. त्यांची ऑक्सिजन लेवल खूप कमी होती. अखेर उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. निमाताला स्मशानभूमीत कोविड प्रोटोकॉलअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.