वार्ताहर/ उचगाव
सुळगा (हिं.) येथील रहिवासी व मराठा बँकेचे माजी संचालक व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर एन. वाय. पाटील (वय 86) यांचा शनिवार दि. 13 रोजी सकाळी सहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी की, एन. वाय. पाटील हे रोज सकाळी पहाटे मॉर्निंग वॉकला जातात. त्याप्रमाणे शनिवारी पहाटे ते एकटेच मॉर्निंग वॉकला बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावर बेळगुंदी फाटय़ापर्यंत जाऊन परत येत असताना सोमनाथ मंदिर पेट्रोल पंपनजीक बेळगावच्या दिशेने जाणाऱया टॅक्सने (क्र. केए 22, एमए 8528) मागून जोराची धडक दिल्याचे समजते. यावेळी त्यांच्या डोक्मयाला जबर मार लागला. तातडीने त्यांना बेळगावला त्याच ट्रक्समधून नेण्यात आले. मात्र, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रक्सचालक सागर फिलिप पिंटो, रा. उचगाव हे गाडी चालवत असल्याचे व काकती पोलीस स्टेशनमध्ये या गुन्हय़ाची नोंद झाल्याचे समजते.
पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्ते चिरंजीव, विवाहित मुलगी असा परिवार आहे.