वृत्तसंस्था /विशाखापट्टणम
विशाखापट्टणम येथील तांटडी समुद्रकिनाऱयावर मच्छिमारांच्या जाळय़ात जगातील सर्वात मोठा शार्क मासा अडकला होता. मात्र, स्थानिक मच्छिमारांच्या सहकार्याने वनविभाग आणि वन्यजीव रक्षकांनी त्याचे प्राण वाचवत त्याला खोल समुद्रात सोडले. जाळय़ात अडकलेल्या शार्क माशाचे वजन 2 टन होते. या शार्क माशाला यशस्वीरित्या जाळय़ातून सोडवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱयांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती. वनविभाग, मच्छिमार आणि वन्यजीव संरक्षक यांच्या समन्वयाने शार्कला खोल समुद्रात सोडण्यात आल्याचे जिल्हा वन अधिकारी अनंत शंकर यांनी सांगितले.
भविष्यात जाळय़ात अशाप्रकारचे मोठे मासे अडकले तर माशांचा बचाव करण्यासाठी मच्छीमारांनी थेट वनविभागाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. व्हेल शार्क हा जगातील सर्वात मोठा मासा मानला गेला आहे. या शार्क माशांच्या प्रजाती सध्या धोक्मयात आल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. शार्क मासे ओळखण्यासाठी आता मालदीव व्हेल शार्क संशोधन कार्यक्रम सरकारकडून त्वरेने राबविला जात आहे.