- मागील 24 तासात 3,297 नवे रुग्ण; 6,107 डिस्चार्ज
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,107 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 19 लाख 70 हजार 053 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 3,297 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 52 हजार 905 वर पोहचली आहे. सध्या 30 हजार 265 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 25 जणांनी आपला जीव गमावला. तर मृतांचा एकूण आकडा 51 हजार 415 एवढा आहे.
- मुंबईत 510 नवे रुग्ण
मुंबईत कालच्या दिवसात 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 624 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,12,303 वर पोहचली आहे. तर 2,94,732 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 03 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,403 इतकी आहे. सद्य स्थितीत 5 हजार 252 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.