@ प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने शहरवासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्यावतीने विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने गुरुवार दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता काडा कार्यालयात जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेण्यात येणार आहे.
शहरवासियांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. घरपट्टीवाढीचा भूर्दंड नागरिकांवर लादण्यात आल्याने घरपट्टी वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या कोरोना प्रसार वाढल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांवर विविध कामांच्या जबाबदाऱया सोपविण्यात आल्या आहेत. घरपट्टी वाढ रद्द करण्याबरोबर पावसाळय़ात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, याकरिता आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा विविध समस्यांचे निवारण करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.