ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच लालबाग परिसरात कोरोनाचे सात रुग्ण आढळल्याने लालबाग मार्केट आज पासून पाच दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून हा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. लालबाग मार्केट हे लाडू, चिवडा, मसाल्याचे पदार्थ यासाठी प्रसिद्ध आहे. पालिकेकडून लॉक डाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती.
या परिसरात गेल्या चार दिवसात सात रुग्ण आढळून आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पासून पाच दिवस हे मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मार्केटमधील जवळपास 300 दुकाने रविवारपर्यंत बंद राहणार आहेत.