बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी नवीन मंत्रिमंडळ शपथ घेण्याच्या काही तास आधी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बोम्माई यांच्यासोबत इतर १२ नेते होते, तंटे सर्वजण बोम्माईंच्या नवीन मंत्रिमंडळात आहेत.
दरम्यान, येडियुरप्पा यांनी नवीन मंत्रिमंडळाचे स्वागत केले आणि मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. बोम्माई म्हणाले की अंतिम यादी राजभवनाकडे पाठवण्यात आली आहे, जी शपथविधी समारंभापूर्वी मंजूर नावे जाहीर करेल.