कारण गुलदस्त्यात, पोलिसात फिर्याद नाही
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी दुपारी बेळगाव येथील चार तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. रात्री या चारही तरुणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून मुतग्याहून मुचंडीला जाणाऱया या मार्गावर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
इब्राहिम सय्यद (वय 24), शाहरुख जमादार (वय 22), रिहान दलायत (वय 18), तिघेही राहणार अमननगर, मोहम्मदरजाक इनामदार (वय 23) रा. रुक्मिणीनगर अशी मारहाणीत किरकोळ जखमी झालेल्या चौघा जणांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रात्री चारही जखमींवर उपचार करण्यात आले. यासंबंधी बुधवारी रात्री मारिहाळ पोलिसांशी संपर्क साधला असता यासंबंधी एफआयआर दाखल झाले नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. मारहाणीचे निश्चित कारण समजू शकले नाही.