प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मलकारे यांनी नुकतीच हुबळी ते मिरज या दरम्यानच्या रेल्वेमार्गाची पाहणी केली. त्यांनी विविध रेल्वेस्थानकांना भेटी देऊन तेथील व्यवस्था, कर्मचाऱयांना देण्यात येणाऱया सुविधा याविषयी माहिती घेतली. धारवाड, अळणावर, पाश्चापूर, बेळगाव, उगारखुर्द, रायबाग, विजयनगर या रेल्वेस्थानकांना भेटी दिल्या.
देशांतर्गत मालवाहतुकीची मोठी जबाबदारी रेल्वेकडे आहे. त्यामुळे मालाची वाहतूक सुरळीत करता येईल, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. अरविंद मलकारे यांनी कर्मचाऱयांशी संवाद साधून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स राखावे, अशा सूचना केल्या. कर्मचाऱयांना साहित्याचे वाटप करण्यात आले.