तालुक्यातील सहा पंचायतींचा स्वखुषीने लॉकडाऊन जाहीर
प्रतिनिधी / वास्को
मुरगाव तालुक्यात लॉकडाऊनची मागणी वाढत आहे. मात्र, सरकार लॉकडाऊनची मागणी पूर्ण करण्यास राजी नसल्याने तालुक्यातील बहुतेक पंचायतींनी स्वताहून आपापल्या क्षेत्रात स्वताहून लॉकडाऊन जाहीर केला आहे. कुठ्ठाळी व वेर्णा पंचायतीबरोबरच काल मंगळवारी चिखली पंचायत, सांकवाळ पंचायत, कासांवली, वेलसांव व बोगमाळो पंचायतीनेही लॉकडाऊन जाहीर केला आहे. काही पंचायतींनी आजपासून दहा दिवस तर काही पंचायतीनी आजपासून सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
मुरगाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ लागल्याने आणि दिवसेदिवस मृतांची संख्याही वाढत असल्याने या तालुक्यातील बहुतेक पंचायतींचा कल कडक लॉकडाऊनकडे आहे. मात्र, सरकार त्यासाठी राजी नसल्याने पंचायतींनी आपल्यापरीने निर्णय घेणे सुरू केले आहे. सोमवारी मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी आणि वेर्णा पंचायतीने आपापल्या पंचायत क्षेत्रात अत्यावश्यक सेवांना मर्यादीत वेळेसाठी मुभा देऊन आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. काल मंगळवारी सांकवाळ पंचायतीने आणि कासावली पंचायतीनेही लॉकडाऊन जाहीर केला. चिखली व बोगमाळो तसेच वेलसांव पंचायतीनेही लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मुरगाव पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 21, 22,23 व 24 या प्रभागातील नगरसेवक श्रध्दा महाले, सुदेश भोसले, विनोद किनळेकर तसेच कॅतरीना झेवियर यांनी आपल्या प्रभागात लॉकडाऊन जाहीर करावे अशी मागणी मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने आपल्या प्रभागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी परवानगी द्यावी असे या नगरसेवकांनी म्हटले आहे.
वास्कोतील वाढत्या कोरोना मृत्यूंना कोळसा प्रदुषण जबाबदार असण्याचा आमदार कार्लुस आल्मेदा यांना संशय
दरम्यान, मंगळवारी दुपारी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्कोतील कोरोना व्यवस्थापनासंबंधी चर्चा व निर्णय घेण्यासाठी शासकीय अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीत आमदार कार्लुस आल्मेदा यांनी वास्कोत मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करून कदाचित कोळसा प्रदुषणाचा हा परीणाम नसावा ना अशी शंका उपस्थित केली आहे. स्थानिक डॉक्टरांनी त्यादृष्टीने पाहणी करावी अशी सुचना आमदारांनी केली आहे.
या बैठकीला मुरगावचे मुख्याधिकारी जयंत तारी, उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलचे आरोग्याधिकारी डॉ. अनिल हुम्रसकर, डॉ. विवेक पिल्ले, डॉ. विश्वजित देसाई, डॉ. रश्मी खांडेपारकर व इतर अधिकारी उपस्थित होते. वास्कोत कोळसा प्रदुषण होत असल्याने बऱयाच लोकांना छातीत संसर्ग होत असतो. त्यामुळे वास्कोत कोरोनामुळे होणाऱग्नया मृत्यूमागे कोळसा प्रदुषण असू शकते असा संशय त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत कोरोना व्यवस्थापनासंबंधीत विषयावर चर्चा झाली. चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱयांची संख्या वाढवण्याची गरज यावेळी व्यक्त झाली. या मागणीचा सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. या हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन पुरवठय़ात वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीत कोविड व्यवस्थापनासंदर्भात इतर विषयांवरही चर्चा झाली. सध्या कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने सर्वत्र लॉकडाऊनची मागणी होत आहे. मात्र, आमदार कार्लुस आल्मेदा यांनी लॉकडाऊन हा एकमात्र पर्याय नाही. लॉकडाऊनच्या दुष्यपरीणामांचाही विचार व्हायला हवा असे मत व्यक्त केले. इतर परीणामांचा विचार केल्यास आपण सुरक्षीत राहण्यासाठी स्वताहून घरी राहणे योग्य असल्याचे ते म्हणाले.