प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रचाराचा शुभारंभ मंगळवार दि. 15 रोजी करण्यात आला आहे. चांगळेश्वरी मंदिर येथे पूजा, अर्चा करून त्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली.
येळ्ळूर विभाग समितीचे अधिकृत उमेदवार राकेश परीट, अनुसया परीट, सोनाली येळ्ळूरकर, वनिता परीट या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल येळ्ळूर विभाग समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सेपेटरी प्रकाश अष्टेकर, कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, उपाध्यक्ष राजू पावले, उपसेपेटरी शिवाजी कदम, एल. आय. पाटील, दत्ता उघाडे, विलास नंदी यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. बिनविरोध आलेल्या उमेदवारांचा अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला. येळ्ळूर येथील कार्यकर्त्यांनी म. ए. समितीला विजयी करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याची चर्चा सुरू आहे. प्रचारावेळी उमेदवारांसह समितीचे शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, अजित पाटील, इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.