खासदार हेमामालिनी यांचे विधान
मथुरा : उत्तरप्रदेश निवडणुकीवरून घडामोडींना जोर आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान मथुरेच्या खासदार हेमामालिनी यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमधून निवडणूक लढविल्यास कार्यकर्त्यांच्या उत्साहात मोठी भर पडणार असल्याचे हेमामालिनी यांनी गुरुवारी म्हटले आहे. भाजप खासदार हेमामालिनी स्वतःच्या मतदारसंघात 8 दिवसीय दौऱयावर पोहोचल्या आहेत. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली असून याप्रकरणी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी असे त्यांनी म्हटले आहे. मथुरा ही भगवान श्रीकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने योगींनी तेथून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास मोठा राजकीय प्रभाव पडणार आहे.