प्रतिनिधी/ सातारा
चेंबूर, मुंबई येथे झालेल्या 34 व्या ज्युनियर मुलांच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा संघाने 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य अशी 7 पदके मिळवून सांघिक उपविजेतेपद (महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक) पटकावला. स्पर्धेचा मोस्ट प्रोमेसिंग बॉक्सर हा मानाचा पुरस्कारही सातारा जिह्याच्या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने मिळवला.
सातारा जिल्हा संघाच्या प्रियांशू रणदिवे (सातारा बॉक्सिंग ऍकॅडमी) याने 60- 63 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. आर्यन कुंभार (राजधानी स्पोर्ट्स अकॅडमी), देवांग कोकीळ (सातारा बॉक्सिंग अकॅडमी), यश ठोंबरे (सातारा बॉक्सिंग अकॅडमी), श्रीराज शिंदे (सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनी), सैफअली झारी (सातारा बॉक्सिंग अकॅडमी) यांनी रौप्य पदक तर, यासर मुलानी (सातारा बॉक्सिंग अकॅडमी) याने कांस्य पदक मिळवले.
सर्व खेळाडूंना सातारा संघाचे प्रशिक्षक सागर जगताप, अमित सांगवान आणि मधुर भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची बिहार येथे होणाऱया ज्युनिअर मुलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. याबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कार्याध्यक्ष रविंद्र झुटिंग, उपाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सचिव राजेंद्र हेंद्रे, विभागीय सचिव योगेश मुंदडा यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी बॉक्सिंग क्लबचे पदाधिकारी मंगेश जाधव, देवेंद्र बारटक्के, अमर मोकाशी, हरीश शेट्टी, रवींद्र होले, संजय पवार, जगन्नाथ जगताप, विनोद राठोड, अमित रणदिवे, सतीश शिंदे आदी उपस्थित होते.