डंबेल्स अन् वेट प्लेटने तयार केले शिवलिंग
भगवान भोलेनाथाच्या भक्तांचा अंदाज और असतो. शिवभक्तीत रमून गेलेला भक्त स्वतःच्या भगवानाबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा असे काही तरी करून जातात जे सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते. अलिकडेच सोशल मीडियावर शिवलिंगाचे एक असे छायाचित्र व्हायरल होत आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे.
विविध प्रकारच्या गोष्टींद्वारे शिवलिंगाची प्रतिकृती तयार केल्याचे तुम्ही पाहिले असेल. परंतु जिम (व्यायामशाळा)मध्ये वापरल्या जाणारी उपकरणे म्हणजेच डंबेल्स आणि वेट प्लेटद्वारे शिवलिंगाची प्रतिकृती तयार केल्याचे निश्चितच पाहिले नसेल.
सोशल मीडियावर एक व्हायरल होत असलेल्या छायाचित्रात मात्र अशाप्रकारचे दृश्य दिसून येते. एका ट्विटर युजरकडून डंबेल्स आणि वेट प्लेटद्वारे तयार करण्यात आलेल्या या शिवलिंगाच्या प्रतिकृतीचे छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. शिवलिंगाची ही प्रतिकृती मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर शहरातील एका जिम संचालकाकडून तयार करण्यात आल्याचे या छायाचित्राच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
व्हायरल होतेय छायाचित्र
डंबेल्स अन् वेट प्लेटद्वारे तयार शिवलिंगाच्या प्रतिकृतीचे छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या छायाचित्रात शिवलिंगाच्या प्रतिकृतीसमोर एक व्यक्ती दिसून येतो. तसेच या प्रतिकृतीवर फुलांचा हार घातल्याचे आणि समोरच्या बाजूला एक दीप लावल्याचे नजरेस पडते. या छायाचित्राला आतापर्यंत 1700 हून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. याचबरोबर जिम मालकाच्या क्रिएटिव्हीटीमुळे ट्विटर युजर्स प्रभावित झाले आहेत.
रचनात्मकता, अध्यात्मिकता आणि दिव्यताचा हा उत्तम संगम आहे असे एका युजरने नमूद पेल आहे. दुसऱया एका युजरने स्वतःची भक्ती दर्शवत ‘हर हर महादेव’ अशी कॉमेंट केली आहे. हिंदू धर्मात शिवलिंगाचे मोठे महत्त्व आहे. याला भगवान भोलेनाथाचेच स्वरुप मानले जाते.