वाई / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील अनपटवाडी येथे पारधी समाजातील महिलेने रान डुक्कराचे मांस विक्री केल्याप्रकरणी वाई वन विभागाने कारवाई करून तिला अटक केली आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार खास खबऱ्याकडून वाई वन विभागास माहिती मिळाली होती की, अनपटवाडी येथील पारधी समाजातील वस्तीमध्ये रान डुक्कराचे मांस विक्री केले जात आहे. त्यावरून दि.11रोजी वाई वनविभागाने त्या वस्तीवर छापा टाकला असता काहीजण तेथून पळून गेले. त्यांच्यातील ही एक महिलेला पकडण्यात वनविभागाला यश आले त्या महिलेचे नाव छम्मा सिंह असून या महिलेने डुक्कराचे मांस विक्री केलेचा गुन्हा कबूल केला आहे. त्यानुसार तिच्यावर वन्यजीव अभिनियम 1972 कलम 9 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.