वृत्तसंस्था/ मनामा
बहरीनमध्ये रविवारी झालेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनने एकेरीचे जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील चॅलेंजर स्पर्धेचे रामनाथनचे एकेरीतील हे पहिले विजेतेपद आहे.
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सहाव्या मानांकित रामकुमार रामनाथनने रशियाच्या कार्लोव्हेस्कायचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये 68 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अजिंक्मयपद पटकाविले. मात्र, या स्पर्धेत रामकुमार रामनाथनला दुहेरीत हार पत्करावी लागली. पोर्तुगालच्या बोर्जेस आणि कॅब्रेल या जोडीने रामकुमार रामनाथन व अर्जुन कढे यांचा उपांत्य सामन्यात 6-3, 1-6, 10-7 असा पराभव केला.