क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आग्रात झालेल्या 25व्या राष्ट्रीय सब-ज्युनियर टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या पुरूष संघाला ब्राँझपदक मिळाले. गोव्याच्या मुलींच्या संघाला उपान्त्यपूर्व बाद फेरीत हरियाणाकडून 7 धावानी पराभूत व्हावे लागले.
गोव्याच्या दोन्ही संघानी या स्पर्धेत चांगला खेळ केला आणि उपान्त्यपूर्व बाद फेरीत प्रवेश मिळविला होता. या स्पर्धेत गोव्याच्या मुलींच्या संघाला जेतेपदाची अपेक्षा होती, मात्र उपान्त्यपूर्व लढतीत पावसाचा व्यत्यय आल्याने गोव्याला पराभव स्वीकारावा लागला.