प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास गोकाक रोड रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे.
बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे 60 वषीय अनोळखी वृध्दाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हातात काठी घेवून रेल्वे रुळ ओलांडताना जोधपूर एक्स्प्रेसची धडक बसून ही घटना घडली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
अनोळखी वृध्दाचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आला आहे. त्याने आपल्या अंगावर पांढरा धोतर, पांढरे नेहरु शर्ट परिधान केला होता. गळय़ात तुळशी माळ आहे. वरील वर्णनाच्या अनोळखी वृध्दा विषयी कोणाला माहिती असल्यास बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.